By  
on  

श्रेयस तळपदेला या खास व्यक्तिकडून मिळाल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेता श्रेयस तळपदेवर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षावर होतोय. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून श्रेयस सध्या प्रेक्षकांची मनं जिंकतोय. मात्र या मालिकेतील कलाकारांची मनही श्रेयसने जिंकली आहेत. म्हणूनच वाढदिवसानिमित्ताने या मालिकेतील कलाकारांनी सोशल मिडीयावर श्रेयसचं भरभरुन कौतुक करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. यात एका खास व्यक्तिकडूनही श्रेयसला शुभेच्छा मिळाल्या आहेत. 

ही खास व्यक्ति म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील परी म्हणजेच मायरा. मायरा आणि श्रेयसची या मालिकेच्या सेटवर चांगलीच मैत्री झाली आहे. श्रेयसने मायरासोबत एक मैत्रीपूर्ण नातं तयार केलय. म्हणूनच मायराने तिच्या मित्राला म्हणजेच भावाला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

 

या गोंडस परीने म्हणजेच मायराने श्रेयससोबतचे फोटो पोस्ट करत लिहीलय की, "ऑनस्किन जरी मी तुला 'फ्रेंड' म्हणत असले आणि ऑफस्क्रिन 'दादा' म्हणून हाक मारत असले तरी तू मात्र या छोट्या मैत्रिणीसोबत जितका खेळकरपणे वागतोस तितकाच तुझ्या लेकीसमान वागवत जीव सुद्धा लावतोस, प्रेम करतोस. म्हणूनच तर मायराला श्रेयस दादा सोबत काम करायला जितकी मज्जा येते, तितकीच परी आणि फ्रेंड यांची केमिस्ट्री स्क्रिनवर सुद्धा धम्माल उडवून देते. अश्या या गोड 'फ्रेंड' म्हणजेच 'श्रेयस दादा'ला परी म्हणजेच मायरा कडून वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!!"

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive