By  
on  

दत्तगुरुंच्या पहिल्या गुरुंची कथा पाहायला मिळणार ‘श्री गुरुदेव दत्त’च्या विशेष भागात

स्टार प्रवाहवरील ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. दत्तजन्माची कथा उलगडल्यानंतर गुरु-शिष्य परंपरेची नेमकी सुरुवात कशी झाली याची उत्कंठावर्धक गोष्ट ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. १६ जुलैला म्हणजेच गुरुपौर्णिमेला श्री गुरुदेव दत्तांचा पहिला गुरु कोण? याचं उत्तर मिळेल.

गुरूपौर्णिमेपासूनच चातुर्मासाचा आरंभ होतो. हिंदू धर्मात अत्यंत पवित्र असा हा महिना मानला जातो. याच महिन्यात दत्तगुरु वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात विद्या संपादनासाठी जाणार आहेत. तत्पूर्वी दत्तगुरुंचे वडिल म्हणजेच अत्री ऋषी त्यांना तीन प्रश्न विचारतात. या तीन प्रश्नांची उत्तरं देण्यात दत्तगुरु कसे सफल होतात? हे पहाणं उत्सुकतेचं असेल. याच दिवसापासून गुरुपौर्णिमा साजरी केली जाऊ लागली. आजही ही परंपरा अखंड सुरु आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दत्तसंप्रदायातील भक्तगण दत्तस्थानी जाऊन दर्शन घेतात. या पवित्र दिवसाचं महत्त्व मालिकेतून पाहायला मिळणं म्हणजे गुरुपौर्णिमेची अनोखी पर्वणी म्हणायला हवं.

त्यासाठी पाहायला विसरु नका ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेचा गुरुपौर्णिमा विशेष भाग १६ जुलैला म्हणजेच गुरुपौर्णिमेला सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive