By  
on  

इरफान खान दोन दिवसांसाठी परतला होता भारतात, त्र्यंबकेश्वर मंदिरात केलं हवन

 बॉलिवूडमधील एक हरहुन्नरी कलाकार म्हणून इरफान खानचं नाव आवर्जुन घेण्यात येतं. काही महिन्यांपूर्वीच इरफानने आपल्याला न्यूरो इन्डोक्राईन हा दुर्धर कॅन्सर झाल्याचं सर्वांना सांगितलं होतं, हे आपण जाणतोच. तेव्हापासूनच तो लंडनमध्ये उपचार घेतोय. चाहते त्याच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करतायत.

मध्यंतरी अनेक वृत्तपत्रांच्या बातमीनुसार, इरफान कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी भारतात येणार होता. परंतु आता एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, इरफान खान गपचूप भारतात आला होता आणि दोन दिवसानंतर तो लंडनसाठी पुन्हा रवाना झाला. या दोन दिवसांत नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेऊन इरफानने तिथे हवन आणि पूजासुद्धा केली. इरफानने त्याच्या आरोग्य आणि स्वास्थ्यासाठी ही पूजा केल्याचं समजतंय. प्रसिध्दी माध्यमांना याची कानोकान खबर लागू न देता तो पुन्हा लंडनला गेला याचं सर्वांनाच आश्चर्य वाटतंय.

काही दिवसांपूर्वी ‘हिंदी मिडियम’चे निर्माते इरफानला भेटण्यासाठी लंडनला गेले होते. त्यांनी इरफानला या सिनेमाच्या सिक्वेलची कथा ऐकवली आणि त्यानंतर त्याने सिक्वलमध्ये काम करण्यासाठी होकार कळवला. त्यामुळे दिवाळीनंतर या सिनेमाचं शूटींग इरफान सुरु करणार असं बोललं जात होतं.

२०१७ साली प्रदर्शित झालेला इरफानचा ‘हिंदी मिडियम’ बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरला. म्हणूनच सिक्वेलचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. पण आता इरफानला जेव्हा डॉक्टर हिरवा कंदील देतील तेव्हाच पुढील सूत्रं हलतील.

Recommended

PeepingMoon Exclusive