By  
on  

Exclusive: कतरिना कैफने सोडलं रेमो डिसूझाच्या 'एबीसीडी 3'वर पाणी

बॉलिवुडची ग्लॅम डॉल अभिनेत्री म्हणून मिरवणारी कतरिना कैफ हिची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला 'झिरो' सिनेमा नुकताच रिलीज झाला. पण हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यात मात्र अपयशी ठरला. तर यापूर्वी आलेला कतरिनाचा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा सिनेमा तर अक्षरश: फ्लॉप झाला. असं असतानाच आता कतरिना मॅडमनी एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय.

यंदा 2019 मध्ये आपले दोन्ही सिनेमे अपयशी ठरल्याने कतरिनाने आता आपला सर्व लक्ष दबंग सलमान खानच्या 'भारत' सिनेमावर केंद्रित केलं आहे. यासाठी तिची प्रचंड मेहनत सुरु असून ती नित्यनेमाने 'भारत'च्या शुटींगला हजर असते आणि सल्लूमियॉंसोबतच्या तिच्या केमिस्ट्रीबद्दल तर आपण बोलायलाच नको.  2019 मध्ये ईदच्या मुहूर्तावर 'भारत' प्रदर्शित होत असल्याने कतरिनाच्या तारखा 'भारत'साठी यापूर्वीच पॅक आहेत. तर 'एबीसीडी 3' च्या निर्मात्यांनासुध्दा तिच्या याच तारखांना शुटींग करायची आहे. मग काय, कतरिनाने क्षणाचाही विलंब न लावता सरळ रेमो डिसूझाच्या 'एबीसीडी 3'वर पाणी सोडून दिलं. भारतच्या शुटींगसाठी तिला याच तारखांदरम्यान लंडनला जावं लागणार असल्याचे वृत्त आहे.

'एबीसीडी 3'चं शिर्षक स्ट्रीट डान्सर ठेवलं गेल्याचं बोललं जात आहे. सलमान खान स्टारर 'रेस 3' साठी रेमो डिसूझा बिझी होता आणि त्यानंतर त्याला ब्रेक हवा होता, म्हणून स्ट्रीट डान्सरच्या सुटींग शेड्यूलसाठी वेळ लागला.  कतरिनाने बॉलिवूडला अनेक सुपरहिट डान्स नंबर दिल्या कारणाने रेमोने या सिनेमासाठी तिला पसंती दिली होती. पण आता एकाचवेळेस ती दोन्ही सिनेमांसाठी वेळ देऊ शकत नसल्याने, आता या डान्सवर आधारित सिनेमात पुन्हा श्रध्दा कपूरच अभिनेता वरुण धवनसोबत झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive