Bicycle Day Special : या कलाकारांचं सायकलसोबत खास नातं, फिटनेससाठी करतात सायकलींग 

By  
on  

अनेकांसाठी सायकल हे दुचाकी वाहन लहानपणापासूनच सोबती असते. फिटनेससाठी तर सायकल हे एक उत्तम वाहन आहे. ज्याने व्यायामही होतो आणि त्यासाठी कोणताही खर्च न करता फक्त हवा भरून त्याला चालवता येतं. सायकलमध्ये कोणतही इंधन वापरत नसल्याने प्रदुषण रोखण्यातही त्याची मदत होते. म्हणूनच काही जण या सगळ्या गोष्टींमुळे सायकलला प्राधान्य देतात. सायकल ही मनोरंजन विश्वातील काही कलाकारांच्या तर आयुष्यातील अविभाज्य घटक बनली आहे.

उमेश कामत 
अभिनेता उमेश कामतला फिटनेसची प्रचंड आवड आहे. त्यासाठी तो नियमीत व्यायाम तर करतोच मात्र सायकलही चालवतो. सायकलने त्याचा उत्तम व्यायाम होतो. उमेशने मुंबई ते लोणावळा हे अंतर देखील सायकलने पार केलाय.

सुयश टिळक 
अभिनेता सुयश टिळकलाही सायकलींगची आवड आहे. सुयशने अनेकदा सायकलने लांबचं अंतर पार केलय. त्याने अनेकदा सायकलवर हिंडत लांबचा पल्ला गाठलाय. त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सायकलने प्रवास करण्याची आवड आहे.  

रेशम टिपणीस
अभिनेत्री रेशम टिपणीस यांनाही सायकल चालवायला प्रचंड आवडतं. कायम फिट असलेल्या रेशम टिपणीस या देखील फिटनेससाठी सायकलींग करतात. नुकतच सोशल मिडीयावर त्यांनी त्यांच्या नव्या सायकलसोबतचा फोटो शेयर केला आहे.

पूजा सावंत
'विजेता' या सिनेमात पूजा एका खेळाडूच्या भूमिकेत झळकली होती. ट्रायथलॉनमध्ये भाग घेणारी ट्रायथलेट तिने या सिनेमात साकारली. पूजालाही सायकलींगची आवड आहे. मात्र या भूमिकेसाठी पूजाने विविध ट्रेनिंग घेऊन मेहनत घेतली होती.

स्नेहलता वसईकर
अभिनेत्री स्नेहलता वसईकरलाही सायकलींगची आवड आहे. सायकलने आरोग्यासाठी होणारे फायदे लक्षात घेऊन ती सायकलला प्राधान्य देते. 

सोनाली कुलकर्णी 
अप्सरा फेम सोनाली कुलकर्णीही अनेकदा सायकलींगला प्राधान्य देते. कमी अंतर गाठण्यासाठी सोनाली अनेकदा सायकलचा वापर करते.


अमृता खानविलकर
अभिनेत्री अमृता खानविलकरला फिटनेसची प्रचंड आवड आहे. व्यायाम, योगा या माध्यमातून अमृता कायम स्वत:ला फिट ठेवते. यात भर म्हणून अमृता सायकलींगही करते.


 
सोनाली कुलकर्णी 
सोनाली कुलकर्णीला लहानपणापासून सायकल चालवायला आवडतं. पुण्याहून मुंबई स्थाईक झाल्यावरही तिने सायकल चालवणं सुरु ठेवलं. जवळचं अंतर गाठण्यासाठी सोनाली अनेकदा सायकलचा वापर करते. ट्रायथलॉनमध्येही सोनाली आवर्जून भाग घेते. 

Recommended

Loading...
Share