By  
on  

पाहा Video : या रिएलिटी शोच्या मंचावर अभिनेता अंकुश चौधरीची हजेरी

'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या डान्स रिएलिटी शोमध्ये एकापेक्षा एक डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळतात. याशिवाय या कार्यक्रमाचे परिक्षक धर्मेश आणि अभिनेत्री पूजा सावंत यांची मस्तीही पाहायला मिळते. मुख्य म्हणजे या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडे आणि पूजा सावंत यांची अधून मधून सुरु असणारी मजा मस्तीही लक्षवेधी ठरते. यातच एका खास पाहुण्याने या मंचावर हजेरी लावली आहे. 

हा खास पाहुणा म्हणजे अभिनेता अंकुश चौधरी आहे. अभिनेत्री पूजा सावंतचा कोस्टार आणि मित्र अंकुशने या मंचावर अचानक हजेरी लावली. हे पाहुन पूजालाही धक्का बसला. 

 

या कार्यक्रमाच्या मंचावर पूजा आणि अंकुशची केमिस्ट्री अनुभवायला मिळणार आहे. दोघांचा खास परफॉर्मन्सही पाहायला मिळेल. नुकताच या एपिसोडचा खास प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. तेव्हा अंकुश चौधरीच्या हजेरीने सजलेला हा खास भाग प्रेक्षक मिस करणार नाही एवढं नक्की.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive