'आई कुठे काय करते' या मालिकेत आता अनिरुध्दच्या अपघातानंतरचा सिक्वेन्स पाहायला मिळतोय. अनिरुद्धला अपघात झाल्यानंतर तो पुन्हा त्याच्या घरी येऊन राहतोय. अपघातानंतर अनिरुद्ध बदललेला दिसतोय. त्याला अरुंधतीची जाणीव झाल्याचं आणि त्याची चूक लक्षात आल्याचं पाहायला मिळतय.
अपघातानंतर अनिरुद्धच्या शरीराला इजा झाली असल्याने घरता अरुंधती त्याची काळजी घेताना दिसतेय. मात्र या पूर्ण विराम लागलेल्या पति-पत्नीच्या नात्याला आता वेगळं वळण मिळत असल्याचं पाहायला मिळतय. नुकत्याच प्रदर्शित केलेल्या प्रमोमध्ये अरुंधती अनिरुद्धची काळजी घेताना दिसत आहे.
तेव्हा अरुंधती आणि अनिरुद्ध या अपघातानंतर पुन्हा एकत्र येणार का हा प्रश्न सगळ्यांना पडला असेलच. मात्र यापुढे काय होईल हे मालिकेत पुढे पाहायला मिळणार आहे.