आई कुठे काय करते या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळतोय. या मालिकेचा विषय आणि पात्र हे प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले आहेत. ही एक कौटुंबिक मालिका असून अनेकांना आपल्या आईची आठवण करुन देणारी ही मालिका आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील घरच्यांचा सांभाळ करणारी आई आणि तिच्याकडे इतरांचं होणारं दुर्लक्ष या आणि इतर गोष्टी या मालिकेत सुंदर पद्धतिने मांडल्या आहेत. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत आईच्या भूमिकेत प्रेक्षकांचं लक्ष वेधतेय.
या मालिकेचे आता 300 भाग पूर्ण होत आहेत. मागील वर्षी आलेली ही मालिका आता 300 भागांचा टप्पा पूर्ण करत आहे. तेव्हा सेलिब्रेशन तर होणारच.
मात्र आता या 300 व्या भागात काय पाहायला मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आपल्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आई आता तिच्या मुलांना साथ देताना दिसत आहे. या सगळ्यात आई म्हणजेच अरुंधतीच्या आयुष्यात तिचा पति अनिरुद्ध आणखी कोणत्या अडचणी आणतोय आणि त्याला ती कशी सामोरी जातेय हे सध्या पाहायला मिळतय. या सगळ्यात या मालिकेला प्रेक्षकांची साथ मिळालेली पाहायला मिळतेय.कारण आता ही मालिका 300 भागांचा टप्पा पार करतेय.
सोशल मिडीयावर स्टार प्रवाह मालिकेच्या अकाउंटवर एक खास पोस्ट करण्यात आली आहे. 300 भाग सादर होत असल्याचं सांगत त्यांनी लिहीलय की, "आज सादर होत आहे 'आई कुठे काय करते !' मालिकेचा ३०० वा एपिसोड.. आपण या ३०० भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार..!! त्याचबरोबर या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार..!! आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना..!"