By  
on  

पाहा Video : अखेर झालं माऊचं बारसं, विलास पाटलांनी ठेवलं हे नाव

'मुलगी झाली हो' या मालिकेत आता माऊ तिच्या वडिलांचं प्रेम मिळताना दिसत आहे. माऊचा द्वेष करणारे तिचे वडिल विलास पाटील आता तिच्यावर जिवापाड प्रेम करताना दिसत आहेत. माऊचे सगळे लाड ते पुरवताना दिसत आहे. मात्र माऊ या नावाची खिल्ली उडवली गेली असल्याने त्यांनी माऊचं चक्क बारसं करायचं ठरवलं आणि तिला नवीन नाव दिलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

नुकतच माऊचं हे बारसं पार पडलं. विलास पाटील यांनी त्यांच्या मुलीसाठी बारशाचा शानदार सोहळा ठेवला. यावेळी अनेक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं. यावेळी माऊलं कोणतं नाव देण्यात येईल याची प्रेक्षकांनाही उत्सुकता होती. तर माऊचं नाव आता 'साजिरी' असं ठेवण्यात आलं आहे. या मालिकेच्या शीर्षक गीतामध्येच हे नाव दडलं आहे. "गोड गोजिरी साजिरी" या शीर्षक गीतातील ओळीतच माऊचं नाव दडलेलं पाहायला मिळतय. हे नवं नाव मिळाल्याने माऊला प्रचंड आनंद झाला आहे. 

यातच या मालिकेत आणखी नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. माऊच्या बारशात दिव्या विघ्न आणताना दिसत आहे. मात्र यात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive