By  
on  

पाहा Video : 'फुलाला सुगंध मातीचा' मध्ये वाढतोय शुभम - कीर्तीच्या नात्यातील गोडवा

'फुलाला सुंगध मातीचा' या मालिकेत मागील आठवड्यात अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले. कीर्ती ही शुभमला घटस्फोट देऊन निघुन जाणार या भितीने शुभम विचित्र वागत होता. तो कीर्तीसोबत उद्धटपणे वागू लागला होता. त्यानंतर तर त्याने चक्क कीर्तीला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला.

एका अपघाताने मात्र या दोघांमधील दुरावा दूर केला आहे. शुभम कीर्तीला घरी सोडण्यासाठी जात असताना कीर्तीच्या बसला अपघात होतो. दोघंही सुदैवाने बचावतात. मात्र या अपघातानंतर दोघं पुन्हा एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. कीर्ती पुन्हा तिच्या सासरी परतली आहे. तर शुभम आणि कीर्तीच्या नात्याला आता वेगळं वळण मिळालेलं पाहायला मिळतय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

शुभम आणि कीर्ती यांचं नातं आता पुन्हा खुलताना दिसत आहे. त्यांच्या नात्यातील गोडवा वाढताना दिसत आहे. तेव्हा दोघांचं हे नातं पुन्हा कसं खुलतय हे पाहणं महत्त्वाचं ठरतय. या नात्यानं जीजी अक्का पुन्हा विघ्न आणणार का हे पुढील भागात समोर येईलच.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive