By  
on  

'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतील ही अभिनेत्री आहे दिवंगत अभिनेत्री सुलभा देशपांडे यांची सून

'फुलाला सुंगध मातीचा' ही मालिका सुरुवातीपासूनच लक्षवेधी ठरतेय. मालिकेचा वेगळा विषय त्यासोबतच मालीकेची कास्ट आणि ते साकारत असलेल्या भूमिका या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. या मालिकेत जीजी अक्कांचा कुटुंबात दरारा दाखवण्यात आलाय. घरातील सगळी मंडळी जीजी अक्कांना घाबरून आहेत. शुभम आणि किर्तीच्या नात्यातही जीजी अक्कांचा धाक पाहायला मिळतो. 

याच जीजी अक्कांची भूमिका या मालिकेत लक्षवेधी ठरते. अभिनेत्री आदिती मूलगुंड-देशपांडे या जीजी अक्कांची भूमिका साकारत आहेत. आदिती यांची अभिनय क्षेत्रातली कारकीर्द मोठी आहे. अनेक हिंदी, मराठी मालिका, नाटक, सिनेमांमध्ये त्यांनी आत्तापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. आदिती या दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या सून आहेत. अनेकांना त्यांच्याविषयीची ही गोष्ट माहिती नाही. प

आदिती यांनी 1996 मध्ये 'करामती' या टेलिव्हीजन कार्यक्रमात काम केलय. त्यानंतर अनेक मराठी सिनेमे आणि टेलिव्हिजन कार्यक्रमातही त्या झळकल्या आहेत. 'नॉट ओन्ली मिसेस राऊत' या सिनेमासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आलय. 2004 मध्ये त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 'पक पक पकाक', 'माईबाप', 'वझनदार', 'दशक्रिया' यासारख्या मराठी सिनेमांमध्येही त्या झळकल्या आहेत. 'मै मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो', 'रिश्ता लिखेंगे हम नया' यासारख्या हिंदी मालिकांमधील त्यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या आहेत.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive