'मुलगी झाली हो' या मालिकेला कमी कालावधी चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेच्या विषयाने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. इतर मालिकांप्रमाणे कोरोना काळात लॉकडाऊनमुळे या मालिकेचही चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर सुरु आहे. त्यामुळे चित्रीकरण झाल्यानंतर किंवा ब्रेकटाईममध्ये हे कलाकार धमाल मस्ती करताना दिसतात.
या मालिकेतील अभिनेता योगेश सोहोनी शौनकची भूमिका साकारतोय. सध्या माऊ आणि शौनकचं नातं दुरावलय. मात्र एसीपी सिद्धांत आणि माऊची जवळीक वाढली असल्याने शौनकला या गोष्टीचा राग येतोय. मात्र मालिकेच्या सेटवर शौनक धमाल करताना दिसतोय. शौनक म्हणजेच अभिनेता योगेश मालिकेच्या सेटवर मस्ती करताना दिसतोय. नुकतच योगेशने सेटवरच पाकगृहात जाऊन चक्क रोटी बनवली आहे. रोटी कशी बनवतात हे शिकूही घेतलय.
योगेशने सेटवरील हा धमाल व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केलाय. योगेशसह या मालिकेतील इतर कलाकारही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. त्यामुळे सेटवर निवांत वेळेत या कलाकारांनी केलेले व्हिडीओ आणि फोटोही हे कलाकार पोस्ट करत असतात.
या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून या मालिकेला आता वेगळं वळण मिळालय. शौनकचं लग्न आता दिव्यासोबत होणार आहे. मात्र माऊ आणि शौनक दुरावले असले तरी त्यांचं प्रेम कायम आहे. या सगळ्यात शौनक दिव्यासोबत लग्न करेल का हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळणार आहे.