By  
on  

जेव्हा घड्याळात वाजणार नऊ, तेव्हा परत येणार तुमची माऊ

कोरोना काळात महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन सुरु असल्याने राज्यात चित्रीकरणाला बंदी आहे. म्हणूनच प्रेक्षकांच्या अविरत मनोरंजनासाठी आणि मालिकांचे नवे भाग प्रसारित करण्यासाठी मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर सुरु आहे. म्हणूनच प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड न पडता त्यांना मालिकांचे नवे भाग पाहता येत आहे.

मुलगी झाली हो या मालिकेला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. मालिका रंजक वळणावर असल्याने प्रेक्षक आवर्जुन पाहत होते. मात्र काही कारणांमुळे या मालिकेचे प्रसारण बंद झाले होते. त्यामुळे मालिका पुन्हा कधी सुरु होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. तेव्हा आता या मालिकेतील माऊ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या 31 मे पासून या मालिकेचं पुन:प्रसारण होणार आहे. घड्याळ्यात नऊच्या ठोक्याला आता माऊ प्रेक्षकांची भेट घेणार आहे. स्वाभिमान या नव्या मालिकेने मुलगी झाली हो मालिकेच्या वेळेची जागा घेतली होती. मात्र आता नऊच्या ठोक्याला माऊ येत असल्याने स्वाभिमान ही मालिका 6.30 वाजता पाहायला मिळणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

स्टार प्रवाहच्या सोशल मिडीयाच्या अधिकृत अकाउंटवरुन ही घोषणा करण्यात आली आहे. यात म्हटलय की, "आता जेव्हा घड्याळात वाजणार नऊ, तेव्हा परत येणार तुमची माऊ...आणि जेव्हा घड्याळात वाजणार साडेसहा, तेव्हा तुमची लाडकी मालिका स्वाभिमान पाहा...सोमवार ३१ मे पासून"

त्यामुळे आता माऊ परत येणार म्हटल्यावर या मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना असेलच. तेव्हा या मालिकेच्या नव्या भागांमधून या मालिकेची पुढीच कहाणी पाहणं रंजक ठरणार आहे. याशिवाय स्वाभिमान या मालिकेतही मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तेव्हा प्रेक्षकांसाठी ही मनोरंजनाची पर्वणीच असेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive