By  
on  

पाहा Video : 'मुलगी झाली हो' मालिकेत सिद्धांतला कळणार शौनक-माऊच्या प्रेमाविषयी

'मुलगी झाली हो' ही मालिका नुकतीच पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेने काही काळ विश्रांती घेतली होती. मात्र पुनरागमनासह ही मालिका रंजक वळणावर पाहायला मिळतेय. मालिकेत अनेक ट्विस्ट सध्या पाहायला मिळत आहेत. दररोज या मालिकेत काहितर इंटरेस्टिंग पाहायला मिळतय. यातच साखरपुड्याच्या दिवशी शौनक जिन्यांवरुन घसरून पडला ज्यामुळे त्याचा दिव्यासोबत साखरपुडा होऊ शकला नाही. एकीकडे एसीपी सिद्धांत माऊच्या प्रेमात आहे तर दुसरीकडे माऊ आणि शौनक एकमेकांच्या प्रेमाला विसरु शकत नाहीयत. 

लवकरच एसीपी सिद्धांत माऊकडे त्याच्या प्रेमाची कबुली देणार आहे. अखेर धाडस करून सिद्धांत माऊला प्रपोज करण्यासाठी जातो. मात्र तिथे त्याला माऊ आणि शौनक एकत्र दिसतात. या दोघांच्या नात्याविषयी काहीही कल्पना नसलेल्या सिद्धांतला यावेळी मोठा धक्का बसतो. सिद्धांतला माऊ आणि शौनकच्या प्रेमाविषयी कळतं. सिद्धांत यावेळी भावुक होताना दिसतो. मात्र हे कळल्यावर काय असेल सिद्धांतचं पुढचं पाऊल ? माऊला सिद्धांतच्या भावना कळतील का ? शौनक-माऊच्या प्रेमाविषयी कळल्यावर काय असेल सिद्धांतचा निर्णय...? हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

माऊचे वडील विलास पाटील यांना देखील शौनक-माऊच्या प्रेमाविषयी काहीच माहिती नाही. मात्र माऊच्या आईसह बहिणींना या नात्याविषयी माहिती आहे. शौनकचा द्वेष करणाऱ्या विलास पाटील यांना शौनक-माऊच्या प्रेमाविषयी कळेल तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive