सिद्धांतसोबत होणार का माऊचा साखरपुडा, पाहा 'मुलगी झाली हो' मधील साखरपुड्याचे फोटो

By  
on  

'मुलगी झाली हो' या मालिकेत सध्या विविध वळण पाहायला मिळत आहेत. एकीकडे वडिलांच्या आनंदासाठी माऊ म्हणजेच साजिरी ही सिद्धांतसोबत लग्न करण्यासाठी तयार झाली आहे. तर दुसरीकडे शौनकची अवस्था वाईट झाली आहे. माऊपासून दुरावल्याने शौनक दारुच्या आहारी गेला आहे.

या सगळ्या दिव्या आणि तिचे वडिल कट कारस्थान रचताना दिसत आहेत. ज्यात आर्याच्या बाळाचा बळी गेलाय. तर साजिरी आणि शौनकच्या नात्याविषयी कळताच विलास पाटलांनी या नात्यास नकार दिला. म्हणूनच आता साजिरी आणि सिद्धांतचं नातं जुळणार आहे. लवकरच दोघांचा साखरपुडा पार पडणार आहे.

या साखरपुड्यासाठी साजिरीच्या कुटुंबाने खास तयारी केलीय. शिवाय साजिरीही छान नटून-थटून तयार झाली आहे.

पण साजिरी आणि सिद्धांतच साखरपुडा पार पडेल का ? या साखरपुड्यात काही अडथळे तर येणार नाहीत ना ? या मालिकेत पुढे काय घडेल हे मालिकेच्या पुढील भागांमधून समोर येईलच.

Recommended

Loading...
Share