माऊचं होणार बारसं, 'मुलगी झाली हो' मालिकेचा विशेष भाग

By  
on  

'मुलगी झाली हो' या मालिकेत एक वेगळाच ट्विस्ट सध्या पाहायला मिळतोय. ज्या मुलीला तिच्या जन्माच्या वेळी तिचा बाप जीव घेणार होता तोच बाप आता मुलीला आपलसं करताना दिसतोय. इतकी वर्ष मुलगी माऊला ज्या विलास पाटीलने स्विकारलं नाही तो विलास पाटील आता आपल्या मुलीवर माया करतोय. 

आपल्या वडिलांवर लागलेला आरोप स्वत:वर घेऊन माऊ स्वत: तुरुंगात गेली होती.  माऊच्या वागण्याने, तिच्या स्वभावानाे विलास पाटीलचं मन जिंकलं आणि आता विलास पाटील अभिमानाने माऊला मुलगी म्हणून स्विकारतोय. यात मालिकेत काही भावुक क्षणही पाहायला मिळत आहेत. मात्र लवकरच या मालिकेचा विशेष भागही पाहायला मिळणार आहे. एक तास नाही तर चक्क दोन तासांचा हा महाएपिसोड असेल.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

माऊला आता नवीन नाव मिळणार आहे. कारण माऊचे बाबा विलास पाटील तिचं बारसं करणार आहे. हा बारस्याचा सोहळा आणि यात माऊला कोणतं नाव मिळेल याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. या मालिकेला आता प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळतेय. त्यातच या मालिकेतील माऊ आणि विलास पाटील हे पात्रही चर्चेत आलं आहे. येत्या 11 एप्रिल रोजी स्टार प्रवाह वाहिनीवर या मालिकेचा विशेष भाग पाहायला मिळेल.

Recommended

Loading...
Share