पाहा Video : 'रंग माझा वेगळा' मालिकेत अशी होणार कार्तिक आणि दीपाची भेट

By  
on  

'रंग माझा वेगळा' या मालिकेत अजूनही कार्तिक आणि दीपामध्ये दुरावा आहे. हा दुरावा दूर करण्यासाठी सौंदर्या इनामदार आणि लावण्या पुढाकार घेत आहेत. दीपा घरी परत यावी यासाठी सौंदर्या प्रयत्न करत आहेत. मात्र कार्तिक त्याच्या मतावर अजूनही ठाम आहे. या दरम्यान कार्तिकने दीपासाठी पत्र लिहीलं होतं. मात्र हे पत्र श्वेताने बदलले असल्याने कार्तिक आणि दीपामध्ये पुन्हा वाद निर्माण झाले. एकीकडे दीपाने प्रेग्नेंट असताना आठवले जोडप्यांच्या सहाय्याने एक हॉटेल सुरु केले आहे. तर दुसरीकडे यात सौंदर्या दीपाच्या काळजीपोटी तिच्याकडे लक्ष ठेवून आहे.

दीपा आणि कार्तिकने पुन्हा एकत्र येऊन बोलावं अशी सौंदर्या आणि लावण्याची इच्छा आहे. म्हणूनच दोघींनी मिळून नवा प्लॅन रचला आहे. या प्लॅनमध्ये दोघी भेटण्याच्या उद्देशाने दीपा आणि कार्तिकला बोलावतात. तिथेच कार्तिक आणि दीपाची पुन्हा भेट होते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

आता या भेटीतून तरी दीपा - कार्तिकमधील मतभेद दूर होतील का ? काय असेल दोघांच्या नात्याचं भवितव्य हे पुढील भागांमधून समोर येईलच. 

Recommended

Loading...
Share